Thu, Jan 15, 2026
शिक्षण स्थानिक बातम्या

माजी शिक्षकांचा रंगलेला स्नेहमेळावा

माजी शिक्षकांचा रंगलेला स्नेहमेळावा
Ashok Ithape
  • PublishedAugust 23, 2023

पाचवड : दि.२० ऑगस्ट –

महात्मा गांधी विद्यालय पाचवड तालुका वाई.या शाळेत, आपले ज्ञानदानाचे कार्य करून सेवापूर्ती झालेल्या.अनेक रयतेच्या सेवकांनी पुन्हा त्याच शाळेत एकत्र येऊन आपल्या जुन्या आठवणी ना उजाळा दिला.एकत्र सेवा करत असताना अनेकदा जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होत असतात.मात्र काळाच्या ओघात काही विस्मृतीत गेलेले असतात.

संसाराच्या रहाट गाडग्यात कुटुबव्यवस्था पाहत असताना आपल्या भूतकाळात गेलेल्या क्षणांना व सहकाऱ्यांना भेटण्याचा अपूर्व योग घडविण्याचे ठरले. नंतर व्हाट्सअप च्या माध्यमाद्वारे बऱ्याच लोकांना एकत्रित केले. त्यांना परत एकदा शाळेची ओढ वाढवली व स्नेहमेळावा साठी विद्यालयात एकत्रित केले.सेवानिवृत्ती नंतरची शाळा माऊलीची हाक व जुन्या मित्रांना भेटण्याची आस यामुळे अनेक सहकारी जमा झाले.

कित्येक जण एकमेकांसमोर येताच भावनांना भरते आले.गप्पांचे फड रंगले तर काही जण इहलोकाची यात्रा संपवून गेल्या मुळे डोळ्यांच्या कडाही ओलावल्या. या मेळाव्यासाठी बरेच माजी प्राचार्य, माजी शिक्षक शिक्षिका तसेच लेखनिक व शिपाई मामा असे 30 जण उपस्थित होते.

या स्नेहमेळाव्यात संकल्पना विद्यमान कलशिक्षक श्री.बाळासाहेब कचरे व श्री.घाडगे पी.पी.मुख्याध्यापक शेरेवडी यांची होती.प्राचार्य लवंड साहेब यांनी हा मेळावा यशस्वी पार पडण्यासाठी बहुमोल सहकार्य केले.अनेक विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटण्यासाठी आले होते.या भेटीत विद्यालया साठी भरीव करण्याचा संकल्प केला गेला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!