Thu, Jan 15, 2026
देश विदेश

शहीद जवान वैभव भोईटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात राजाळे येथे अंत्यसंस्काऱ

शहीद जवान वैभव भोईटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात राजाळे येथे अंत्यसंस्काऱ
Ashok Ithape
  • PublishedAugust 21, 2023

सातारा, दि.21(जिमाका): शहीद जवान वैभव संपतराव भोईटे यांच्या पार्थिवावर आज राजाळे, ता. फलटण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी भरत बोडरे, बीड जिल्हा कारागृह अधीक्षक विलास भोईटे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, राजाळेच्या सरपंच स्वाती दौंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसाहेब काळे यांनी शहीद जवान वैभव भोईटे यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

शहीद वैभव भोईटे यांचे वडील संपतराव भोईटे यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

लडाख येथे देशसेवा बजावत असताना झालेल्या अपघातात वैभव भोईटे शहीद झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पती, पत्नी व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!