Thu, Jan 15, 2026
ग्रामीण बातमीपत्र

पाऊस पडावा म्हणून पिंपोडकरांनी नागेश्वर मंदिरातील पिंड ठेवली पाण्यात.

पाऊस पडावा म्हणून पिंपोडकरांनी नागेश्वर मंदिरातील पिंड ठेवली पाण्यात.
Ashok Ithape
  • PublishedAugust 20, 2023

यापूर्वीही महादेवाची पिंड पाण्यात ठेवल्यामुळे हटला होता दुष्काळ  पिंपोडे बुद्रुक येथील नागरिकांनी संपूर्ण मंदिरातील गाभाऱ्यामध्ये भरले पाणी.

वाठार I प्रतिनिधी –

कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ सदृश्य स्थिती होत असताना दिसून येत आहे, हाता-तोंडाला आलेली घेवड्याची पिके कडक उन्हामुळे माना टाकताना दिसून येत आहेत काही गावांमध्ये तर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई होत आहे, पिण्याचे पाणी सुद्धा काही गावांमध्ये उपलब्ध होत नसल्याने नागरिक खाजगी टँकरच्या साह्याने पिण्यासाठी पाणी घेत आहेत याच्यात पार्श्वभूमीवर वरुण राजाने पुन्हा एकदा कृपादृष्टी दाखवावी या भूमिकेतून उत्तर कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक गावातील नागरिकांनी नागेश्वर मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीला साकडे घालीत महादेवाची पिंड पाण्याखाली ठेवली आहे.

संपूर्ण मंदिरामध्ये गावकऱ्यांनी व महिला भगिनींनी हंडा, कळशीच्या सहाय्याने संपूर्ण नागेश्वर मंदिरामध्ये पाणी भरले आहे फार प्राचीन काळापासून या मंदिराची अशी आख्यायिका आहे की मोठ्या प्रमाणावर पडलेल्या दुष्काळामध्ये महादेवाची पिंड जर पाण्याखाली ठेवली तर महादेव नवसाला पाऊन पाऊस पडल्याचे जुने जाणते लोक सांगत आहेत.

याचाच दाखला घेऊन नव्या पिढीतील युवकांनी, महिला भगिनींनी व ग्रामस्थांनी आज सकाळी १० वाजल्यापासून सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक येथे असणाऱ्या अतिप्राचीन नागेश्वराच्या मंदिरातील गाभाऱ्यामध्ये पाणी भरण्यास सुरुवात केली होती यावेळी शेजारी असणाऱ्या विहिरी मधील युवक पाणी काढून रांगेने मंदिरामध्ये भरत होते प्रत्येक जण महादेवाच्या पिंडीवर पाणी ओतताना देवाला पाऊस पडावा म्हणून साकडे व प्रार्थना करताना दिसून येत होता.

यावर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे सावट असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी टाहो फोडाताना दिसून येत आहेत याच्यात पार्श्वभूमीवर अतिप्राचीन असणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या नागेश्वर मंदिरामध्ये महादेवाची पिंड पाण्याखाली ठेवली असता आत्तापर्यंत हमखास पाऊस पडल्याचे चित्र आहे त्यामुळे याही वर्षी आम्ही पिंपोडे बुद्रुक येथील नागरिक पाऊस पडावा म्हणून महादेवाची पिंड पाण्याखाली ठेवून संपूर्ण गाभाऱ्यामध्ये पाणी भरत आहोत व महादेवाला एकच साकडे घालत आहोत की दुष्काळ हटवून पाऊस पडावा.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!