Thu, Jan 15, 2026
देश विदेश

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Ashok Ithape
  • PublishedAugust 18, 2023

सातारा दि.17 (जिमाका) : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारासाठी www.awards.gov.on या संकेतस्थळावर दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षा पर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलीली आहे, अशा मुलांना बाल शक्ती पुरस्कार देण्यात येतो.

बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला बाल कल्याण पुरस्कार देण्यात येतो. ही संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण कार्य करणारी असावी.

बाल शक्ती पुरस्कार सन 2024 व बाल कल्याण पुरस्कार 2024 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. पुरसकाराच्या माहितीसाठी www.awards.gov.on या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!