परीट समाजाचा रविवार दिनांक २० ऑगष्ट रोजी भव्य कार्यक्रम
![]()
संस्थेच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने समाज बांधव साधनार संवाद
भुईंज l प्रतिनिधी : सातारा जिल्हयातील परीट समाज बांधवांची हक्काची असणारी संत गाडगे महाराज समाज सेवा संस्था सातारा यांच्या ४६ वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न होत आहे.
यानिमित्ताने जिल्हयातील समाज बांधवांचे लॉण्ड्री व्यवसायकांची अडी अडचणी, समाजाचे प्रलंबीत प्रश्न, आरक्षण याबाबत विशेष मार्गदर्शन संस्थच अध्यक्ष शामराव सोनटक्के, माजी अध्यक्ष भिक राक्षे गुरुजी, जेष्ठ मार्गदर्शक पध. दळवी सर, जेष्ठ नेते शंकरराव हवाळे आप्पा संस्थेचे संपर्क प्रमुख पत्रकार जयवंत पिसाळ आदी करणार आहेत अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस गणेश रोकडे यांनी दिली.
ही वार्षिक सभा व कार्यक्रम संस्थेची स्वमालकीची इमारत असलेल्या कामाठीपुरा येथील सांस्कृतिक भवन येथे दुपारी १ वाजता संस्थेचे अध्यक्ष शामराव सोनटक्के यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे.













