Thu, Jan 15, 2026
देश विदेश

पद्म पुरस्कार- 2024 साठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नामांकने पाठवता येणार

पद्म पुरस्कार- 2024 साठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नामांकने पाठवता येणार
Ashok Ithape
  • PublishedAugust 17, 2023

नवी दिल्‍ली, 16 ऑगस्ट 2023

प्रजासत्ताक दिन, 2024 च्या निमित्ताने  घोषित करण्यात येणार्‍या पद्म पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन नामांकने/शिफारशी स्वीकारायला 1 मे 2023 रोजी प्रारंभ झाला. या पुरस्कारांसाठी नामांकने पाठवण्याची शेवटची तारीख  15 सप्टेंबर 2023 ही आहे. यासाठीची नामांकने/शिफारसी केवळ ऑनलाईन स्वरूपातच राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर पाठवता येतील.

या नामांकने/शिफारसीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर उपलब्ध विहित नमुन्यात संपूर्ण  माहिती भरुन पाठवायची आहे. त्यामध्ये शिफारस केलेल्या संबंधित व्यक्तीच्या कार्याविषयीची माहिती (जास्तीत जास्त 800 शब्दांत) भरुन पाठवायची आहे, ज्यात त्या व्यक्तीची, संबंधित क्षेत्र/शाखेतील  उल्लेखनीय कार्य, सेवा  यांचा स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख असावा.

या संदर्भातील सविस्तर माहिती, ‘पुरस्कार आणि पदके (‘Awards and Medals’) शीर्षकाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर  (https://mha.gov.in)  आणि  पद्म पुरस्कार पोर्टल  (https://padmaawards.gov.in)  वर  उपलब्ध आहे. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम देखील  https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx  या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!