पत्रकारांनी वाई उपविभागीय व तहसील कार्यालया समोर केली पत्रकार संरक्षण कायद्याची होळी
![]()
वाईमध्ये पत्रकारांनी एकजूट दाखवत आवळली वज्रमूठ, पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असताना त्याची अमलबजावणी होत नाही. या निषेधार्थ वाई तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन आपली एकजूट दाखवत या संरक्षण कायद्याची होळी करून रोष व्यक्त केला.
वाई । प्रतिनिधी : राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी कुचराई होत असल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर गुरुवारी (दि.१७ ऑगस्ट) पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. तर पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्लाचा निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली.
राज्यात पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्लाचा मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने निषेध करण्यात आला.
पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी व पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी करण्यात आली वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव व तहसीलदार सोनाली मिटकरी यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनाला तालुक्यातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच तालुक्यातील राजकीय, सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे कळविले.
या आंदोलनात सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्तानाना मर्ढेकर, वाई तालुका अध्यक्ष विश्वास पवार,उपाध्यक्ष धनंजय घोडके,उपाध्यक्ष, किशोर रोकडे, सचिव पांडुरंग भिलारे खजिनदार संजय भाडळकर जेष्ठ पत्रकार मधु नेने,भद्रेश भाटे,जयवंत पिसाळ, संजीव वरे, पुरुषोत्तम डेरे, कृष्णात घाडगे, अमोल महांगडे, कुमार पवार विठ्ठल माने, तानाजी कचरे, जितेंद्र वारागडे, अशोक इथापे, संजय माटे, दीपक मांढरे, प्रवीण गाडे, आशिष चव्हाण, नितीन जगताप, अजय संकपाळ, भाऊसाहेब सपकाळ, अजय संकपाळ, अक्षय क्षिरसागर, मंगेश पवार याशिवाय भाजपाचे अविनाश फरांदे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे विक्रम वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे मामा देशमुख, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विलास पिसाळ, अतुल संकपाळ वसंत शिंदे, अक्षय निंबाळकर आदी उपस्थित होते.













