अभेपुरी ता.वाई येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आजी-माजी सैनिकांचा सत्कार
![]()
अभेपुरी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शहीद कोनशीला अनावरण करताना एकनाथ खोपडे, सरपंच सारिका मांढरे, उपसरपंच स्वप्निल पाचपुते,रवींद्र मांढरे व ग्रामस्थ
वाई / प्रतिनिधी : अभेपुरी (ता. वाई) येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
वीरपत्नी श्रीमती रेश्मा गणेश ढवळे, शहीद चंद्रशेखर देशमुख यांचे वडील संजय देशमुख यांच्या हस्ते गावातील ६७ आजी माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तत्पूर्वी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पंचप्राण ज्योतीचे प्रज्वलन व ७५ वृक्षांचे रोपण करण्यात आले.
माजी सैनिक दत्तात्रय मांढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शहीद कोनशीला अनावरण माजी सैनिक एकनाथ खोपडे यांच्या हस्ते झाले.
सरपंच सारिका मांढरे, उपसरपंच स्वप्निल पाचपुते, वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र मांढरे, ग्रामपंचायत सदस्य अप्पा मांढरे, सचिन दळवी, विजय मांढरे,सुमन मांढरे, हेमा पवार, सुजाता मांढरे, प्रतिभा मांढरे,ग्रामसेविका सोनवलकर, मुख्याध्यापक सुरेश नायकवडी,संतोष भोसले, बाप्पासाहेब वाळेकर,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवी ओवाळ यांनी सूत्रसंचालन केले. दीपक पवार यांनी आभार मानले.













