Thu, Jan 15, 2026
स्थानिक बातम्या

पत्रकारांच्या आंदोलनास रयत स्वाभिमानी संघटनेचा पाठिंबा

पत्रकारांच्या आंदोलनास रयत स्वाभिमानी संघटनेचा पाठिंबा
Ashok Ithape
  • PublishedAugust 16, 2023

सातारा / प्रतिनिधी :

पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदयाची अंमलबजावणी करण्यात होत असलेल्या कुचराईच्या निषेधार्थ राज्यातील पत्रकारांच्या अकरा प्रमुख संघटनांशी जोडले गेलेले सर्व पत्रकार गुरूवार, दि. १७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात प्रत्येक शहरात निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करणार आहेत, या आंदोलनाला रयत स्वाभिमानी संघटना पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांनी म्हटले आहे.

पत्रकारांच्या नियोजित आंदोलनास पाठिंबा देत असल्याच्या प्रसिद्धी पत्रकात श्री. पवार यांनी म्हटले आहे की, पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास अर्वाच्च शिविगाळ केल्यानंतर आणि चार गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्यानंतरही या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही. राज्यातही जेथे जेथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडतात तेथे तेथे पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास टाळाटाळ होताना दिसते. सन 2019 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर जवळपास दोनशे पत्रकारांवर हल्ले झाले, त्यांना शिविगाळ केली गेली किंवा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.

पतरकार संरक्षक, कायदा करण्यात आला तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकार संघटनेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी तसेच सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सकाळी 11 वाजता त्या त्या तहसील कार्यालयांमध्ये पत्रकारांतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनास रयत स्वाभिमानी संघटना पूर्णपणे पाठिंबा देत असून पत्रकारांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, म्हणून पत्रकारांच्या संघटनांमार्फत होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सक्रिय आहोत असेही सागर दादापवार यांनी या पत्रकात म्हटले आहे.

या प्रसिद्धी पत्रकावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशीलदादा कदम, जिल्हा सचिव अभय जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप जाधव, तालुकाध्यक्ष तेजस काकडे, जिल्हा उपाध्यक्ष सुमितभाऊ साळुंखे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!