रविवारी ‘तिरंगा’मध्ये स्क्वॅश जिल्हा निवड चाचणी स्पर्धा
भुईंज : स्क्वॅश खेळाच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धा रविवार दि. १३ ऑगस्ट रोजी पाचवड, ता. वाई येथील तिरंगा इंग्लिश स्कुल येथे होणार आहेत.
याबाबत माहिती देताना संस्थेचे सचिव जयवंत पवार व असोसिएशनचे सचिव गणेश शिंदे यांनी सांगितले, की सातारा जिल्हा स्क्वॅश असोसिएशनच्या वतीने ही निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. त्याच्या संयोजनाचा लाभ तिरंगा स्कुलला मिळाला ही अत्यंत आनंदाची बाब तर आहेच शिवाय तिरंगा स्कुलच्या क्रीडा क्षेत्रातील कर्तबगारीची दखल घेणारी आहे.
ही निवड चाचणी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तिरंगाच्या वतीने प्रयत्न केले जात असून स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे.
याबाबत संबधित कोच व खेळाडूंनी असोसिएशनचे अध्यक्ष वीरभद्र कावडे (9423265188) किंवा सचिव गणेश शिंदे (9921737540) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जयवंत पवार यांनी केले आहे.













