Thu, Jan 15, 2026
अध्यात्म

माणसाने माणसा सारखे वागणे हा कानमंत्र देत विश्वचैतन्य प. पू. श्री. सद्गुरू नारायण महाराज तथा आण्णा महाराज यांनी दिला उर्जा मंत्र

माणसाने माणसा सारखे वागणे हा कानमंत्र देत विश्वचैतन्य प. पू. श्री. सद्गुरू नारायण महाराज तथा आण्णा महाराज यांनी दिला उर्जा मंत्र
Ashok Ithape
  • PublishedAugust 12, 2023

भुईंज येथे कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या प्राचीन काळातील आचार्य भृगुऋषी आश्रमात (मटावर) श्री क्षेत्र नारायणपूरचे विश्वचैतन्य प.पू. श्री. सद्गुरू नारायण महाराज तथा आण्णा महाराज यांनी रचलेल्या नारायण ज्ञानबोध या ग्रँथाचे सामुदायिक पारायण महिला सेवेकरी यांनी पुर्ण केले त्याची सांगता समारंभात सद्गुरु आण्णा महाराज बोलत होते.

यावेळी बोलताना सद्गुरू आण्णा महाराज यांनी उपस्थित भाविकांना आनंदाचा आनंद म्हणजे काय तो कसा अनुभवावा याचे दाखले देत मानव जन्माचे व देहाचे कसे कल्याण करावे हे दाखले देत उपस्थितांना आशिर्वाद दिला.

तर यावेळी बोलताना श्री. क्षेत्र नारायणपूर देवस्थानचे व्यवस्थापक भरतनाना क्षिरसागर यांनी भुईंज है गाव तिर्थक्षेत्र भुईंज म्हणून कसे घडले याचा मागोवा घेत हे तिर्थक्षेत्र माहात्म खूप मोठे आहे ते जपा यासाठी दत्तसेवेकरी मंडळ महिला सेवेकरी मंडळ व तरुणाईचे कौतुक करत येथील जिर्णोद्धाराला तीन तपांचा प्रवास हाच मोठा ठेवा आहे असे सांगत श्री सद्गुरू नारायण महाराज हे भुईजला व कृष्णाकाठाला अग्रमानांकित मान देतात असे हि ते म्हणाले..

तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर पाटील यांनी श्री क्षेत्रनारायणपूरचा महिमा व सद्गुरूंचे आलेले अनुभव सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिला वाचकांच्यावतीने सौ. राजश्री भोसले पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी भुईंज ग्रामस्थांच्यावतीने भैय्यासाहेब जाधवराव यांनी सद्गुरूचे पाद्यपुजन केले.

जेष्ठ शिष्य रविंद्र भोसले पाटील व माजी सरपंच अर्जुन भोसले, उपसरपंच शुभम पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमास पै. जयवंत पवार, महामार्ग पोलीस अधिकारी बाजीराव वाघमोडे, भुईजचे सरपंच विजय वेळे, माजी सरपंच सौ. पुष्पा भोसले, अरुणशेठ वालेकर यांच्यासह पंचकोशीतील भाविक भक्तगण मोठया संख्येने हजर होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार जयवंत पिसाळ यांनी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!