तलवारबाजी क्रीडा प्रकारात सातारचा दबदबा
![]()
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत 16 पदकांची लयलुट; छत्रपती शिवेंद्रराजेंकडून कौतुक
सातारा / प्रतिनिधी
राष्ट्रीय पातळीवरील तलवारबाजी क्रीडा प्रकारात विविध गटातील स्पर्धांमध्ये सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी एकूण 16 पदके पटकावली.
राष्ट्रीय पातळीवरील सब जुनियर, जुनियर, सिनियर, खेलो इंडिया, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी या झालेल्या स्पर्धांमध्ये तलवारबाजीमध्ये सातारा फेन्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी 16 पदके मिळवली. यामध्ये सृष्टी जाधव, भूषण वरखडे, आर्या पोळ, नूतन वरखडे, अनन्या वरखडे, प्रसाद सणस, साहिल गुर्जर, रोहन पवार, प्रणव पोळ, वेदराज कुंकले, ऋतुराज कुंकले, आदिती वाघमारे, रिद्धी फणसे, योगिता मुंगसे, स्वराली वरखडे, अथर्व वरखडे, कार्तिक वरखडे, शंभूराज फणसे, विघ्नेश जाधव, सुशांत सोनावणे, पियुष वरखडे, सखाराम पांढरे, वरद साळी, विटजा साळी या खेळाडूंचा समावेश आहे.
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून सत्कार
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या खेळाडूंचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. साताऱ्यातील खेळाडूंनी तलवारबाजीत दबदबा निर्माण केला असून त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. यावेळी खेळाडूंचे प्रशिक्षक प्रफुल्ल जगताप, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.













