Mon, Mar 2, 2026
यशोगाथा

सुधांशूच्या कर्तबगारीचा अंश इतरांना प्रेरणादायी ठरावा

सुधांशूच्या कर्तबगारीचा अंश इतरांना प्रेरणादायी ठरावा
Ashok Ithape
  • PublishedAugust 10, 2023

सुधांशु प्रमोद रणसिंग. इंजिनिअरिंगसाठी NIT नागपूरला गुणवत्तेवर ऍडमिशन.

माझे वाघोली येथील साडू व मेव्हणीचा मुलगा म्हणून फक्त या गोष्टीचा आनंद नाही तर केंद्र सरकारची NIT, नागपूर म्हणजे काय दर्जा आहे हे ज्याना माहिती त्यांना त्याचे महत्व कळेल.

त्याही पलीकडे आंनदापेक्षा अभिमान कशाचा?

तर, या पोराने वाघोली सारख्या गावात रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन, त्या दरम्यान IIT किंवा NIT तच प्रवेश घ्यायचा हे पक्के ठरवून घरीच अभ्यास केला आणि त्याने फत्ते केली.

केंद्र शासनाच्या अशा कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी केवळ घरी अभ्यास करून प्रवेश मिळवणारा लाखात शब्दशः लाखात एखादा विद्यार्थी असू शकेल. त्या लाखात हा सुधांशु आहे. अभिमान आहे तो त्याचाच.

लहानपणापासून हे पोर नंबरात. अभ्यासात कर्तबगारी दाखवायचीच हे त्याने पक्के ठरवलेलं.

त्या निर्धाराने एक महत्वपूर्ण टप्पा त्याने सर केला आहे.

महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या दोनच संस्था एक IIT मुंबई व दुसरी NIT, नागपूर. IIT असो किंवा NIT इथं प्रवेश म्हणजे ‘लाईफ बन गई’ असेच समजले जाते.

त्या अर्थाने सुधांशूने NIT त गुणवत्तेवर आणि केवळ घरीच अभ्यास करून, घरच्यांना किंचितशी आर्थिक तोशीस न देता स्वतःच्या उज्वल भविष्याचा पाया निश्चित केला आहे हे नक्कीच. मात्र, हे पोर एवढ्यावर थांबणार नाही. तर NIT मधील शिक्षण काळातही तो प्रत्येक वर्षी चमकत राहणार हे नक्की.

काही महिन्यांपूर्वी १२ वीच्या परीक्षेनंतर काही दिवस तो भुईंजमधेही आमच्याकडे अभ्यासासाठी राहिला होता. लहानपणापासून त्याच्या बुद्धीची चमक माहितीच आहे. पण भुईंज मधील आमच्या येथील वास्तव्यात ती विशेष भावली. आज त्याचवेळी वाटलेला विश्वास त्याने सार्थ करण्याची औपचारिकता पार पाडली.

त्याच्या अफाट मेहनतीला सलाम, त्याच्या अलौकिक जिद्दीला सलाम, त्याच्या दुर्मिळ चिकाटीला सलाम, आणि पुन्हा सांगतो, लाखात शब्दशः लाखात एक ठरणाऱ्या घरीच स्वयं अध्ययन करून मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन.

श्री. प्रमोद व सौ. माया रणसिंग या त्याच्या माता पित्याचे देखील अभिनंदन करावे तेवढे कमीच.

ही अश्शी कर्तबगारी इतर सर्व सुविधा, व्यवस्था प्राप्त विद्यार्थ्यांचीही प्रेरणा झाली पाहिजे. त्यासाठी सुधांशुच्या कर्तबगारीचा एक अंश अशा जिद्दी विद्यार्थ्यांनी नक्की घ्यावा.

राहुल तांबोळी, भुईंज

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!