साताऱ्याची आदिती स्वामी बनली विश्वविजेती धनुर्धर.
अवघ्या १७ व्या वर्षी जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धा जिंकताना अदितीने दाखवलेले कौशल्य, अचूकता, स्थिरता कमालीची होती.
अंतिम लढतीत तिने मेक्सिकन बेसेराला १४९-१४७ ने हरवले. भारताच्याच ज्योती वेन्नमने कांस्य जिंकले.
साताराच्या शिरपेच्यात अजून एक मानाचा तुरा .
शूरवीरांच्या भूमीमध्ये जन्मलेल्या शेरेवाडी गावची कन्या कुमारी आदिती गोपीचंद स्वामी हिला 36 व्या नॅशनल गेम्स गुजरात अहमदाबाद येथे झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांक मिळवून एक इतिहास घडविला. धन्य ते तिचे आई-वडील ,समस्त जिल्हा वाशियांकडून आदिती गोपीचंद स्वामी ला पुढील वाटचालीस लक्ष शुभेच्छा.













