भुईज येथे आचार्य भृगुऋषी मटावर श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथाचे सामुदायिक पारायण
श्री क्षेत्र भुईंज येथे आचार्य भृगुऋषी मठावर श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथाचे पारायण पठण कार्यक्रमास महिलांची उस्फुर्त गर्दी तर युवकांचाहि वाढता सहभाग झाल्याने कृष्णातीरी होतोय सदगुरूंच्या कर्तृत्वाचा जागर
श्री क्षेत्र भुईंज येथील संथ वाहणा-या कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या आचार्य भृगूमहर्षीच्या आश्रमात (मठात) श्री क्षेत्र नारायणपूर येथील विश्व चैतन्य प.पू. श्री सदगुरु नारायण महाराज उर्फ आण्णा महाराज यांनी लिहीलेल्या नारायण ज्ञानबोध ग्रंथाचे पारायण भुईंज आणि परिसरातील महिला भाविक सेवेकरी यांच्या सहभागातून सुरू आहे. आधिक महिन्यातील व्रतवैकल्यात ग्रंथांचे पारायण घरोघरी होत असते परंतु भुईंज येथील महिला सेवेकरी यांनी सलग तिस-यावर्षी वा पारायण सोहळ्याचे नियोजन केल्याने त्यांना वाचक महिला व श्रोते वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
वाच गंथात सदगुरूंनी भस्म महिमा व भुईजच्या भृगुऋषी मठाचा जिर्णोद्धार कसा झाला याचे हि महास्य सांगताना नव्या पिढीला खूप काही ज्ञान मिळते असे या ग्रंथाचे महात्म्य सांगणा-या महिला सेवेकरी सौ. जयश्री भोसले पाटील यांनी सांगितले. या सोहळयात सदगुरू आण्णा महाराज व पोपट महाराज स्वामी जेष्ठ शिष्य भरतनाना क्षीरसागर हे भेट देवून मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळयाची सांगता शुक्रवार दिनांक ११ ऑगष्ट २०२३ होणार आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी काठावर आचार्य भृगुऋपी मठावर देवी महालक्ष्मी मंदिरात भावीकांची गर्दी वाढत आहे.













