Thu, Jan 15, 2026
तरुणांचा कट्टा योजना

भारतीय मानक ब्युरो, बीआयएस ने महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील शाळा/महाविद्यालयांमध्ये स्थापन केलेल्या स्टँडर्ड क्लबच्या मार्गदर्शकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे केले आयोजन

भारतीय मानक ब्युरो, बीआयएस ने महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील शाळा/महाविद्यालयांमध्ये स्थापन केलेल्या स्टँडर्ड क्लबच्या मार्गदर्शकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे केले आयोजन
Ashok Ithape
  • PublishedAugust 9, 2023

मुंबई, 8 ऑगस्ट 2023

भारतीय मानक ब्युरो, बीआयएस च्या मुंबई शाखा कार्यालयाने गेल्या आठवड्यात (3 आणि 4 ऑगस्ट, 2023 रोजी) शाळा/महाविद्यालयांमध्ये स्थापन केलेल्या स्टँडर्ड क्लबच्या मार्गदर्शकांसाठी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बीआयएस, मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक प्रयोगशाळेने याचे आयोजन केले होते आणि मुंबई, ठाणे, रायगड,सिंधुदुर्ग आणि नाशिक या जिल्ह्यांमधील मार्गदर्शकांसाठी आयोजित अशाप्रकारचा हा पाचवा प्रशिक्षण कार्यक्रम आहे.

विद्यार्थ्यांमध्ये मानकीकरण आणि गुणवत्तेसंदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने बी आय एस ने अनेक उपक्रम सुरु केले आहेत, असे शास्त्रज्ञ /वरिष्ठ संचालक आणि बी आय एस मुंबई शाखा कार्यालयाचे प्रमुख संजय विज, यांनी या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि बी आय एस च्या कार्याबद्दल माहिती देताना सांगितले. युवा पिढीमध्ये  गुणवत्तेबद्दल जागरुकता आणि देशात गुणवत्तापूर्ण परिसंस्था विकसित करण्यासाठी हा एक मैलाचा दगड ठरेल, असे ते म्हणाले

गुणवत्ता आणि मानकीकरणाची  संकल्पना आणि मानकीकरणाचे लाभ याविषयी विस्तृत माहिती देताना डी डी जी डब्लू चे संजय गोस्वामी यांनी दैनंदिन आयुष्यातील उदाहरणे देऊन ते स्पष्ट केले. व्यावहारिक जीवनात उपयोगात येणाऱ्या मानकांबद्दल आणि खेळण्यांच्या सुरक्षिततेसाठीच्या मानकांसारख्या काही नवीन मानकांची माहिती दिली. याशिवाय आपले जीवनमान   सुधारण्याच्या दृष्टीने  ब्युरोने हाती घेतलेल्या कार्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली, उदाहरणार्थ विशेषत: सोन्याच्या हॉलमार्किंगची योजना, अनिवार्य उत्पादनांसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश  इत्यादी.

प्रशिक्षणादरम्यान बी आय एस मुंबई शाखा कार्यालयाचे शास्त्रज्ञ / उपसंचालक टी. अर्जुन  यांनी बी आय एस  उपक्रम, गुणवत्ता आणि मानकीकरण आणि मानकांची संकल्पना यांची सादरीकरणाद्वारे तपशीलवार माहिती दिली. बी आय एस मुंबई शाखा कार्यालयाचे शास्त्रज्ञ / उपसंचालक   निशिकांत सिंग यांनी बी आय एस वेबसाइट आणि बी आय एस CARE अॅपची वैशिष्ट्ये आणि वापर याविषयी माहिती दिली.  बीआयएस पोर्टल्सच्या प्रभावी वापराचे मार्गही त्यांनी स्पष्ट केले.

बी आय एस मुंबई शाखा कार्यालयाचे  शास्त्रज्ञ / सहाय्यक संचालक चिरागकुमार गज्जर यांनी स्टॅंडर्ड क्लब च्या स्थापनेसंदर्भातील मार्गदर्शक तत्वांबद्दल माहिती दिली. त्यांनी स्टॅंडर्ड क्लब च्या मार्गदर्शकांची जबाबदारी आणि कर्तव्ये याबद्दल माहिती दिली तसेच ब्युरो च्या वतीने देशभरात पाच हजारांहून अधिक स्टॅंडर्ड क्लब ची निर्मिती झाली आहे, असे सांगितले. प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान, सर्व सहभागींचे वेगवेगळे गट तयार करून अनेक उपक्रम राबवण्यात आले. मानके तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली.

बी आय एस मुंबई शाखा कार्यालयाचे शास्त्रज्ञ /सहाय्यक संचालक शुभम चौधरी, यांनी मानकीकरण आणि मानकांची रचना स्पष्ट केली. कार्यक्रमादरम्यान सामूहिक उपक्रम  आणि मानक लेखन कार्यशाळा घेण्यात आल्या.

 

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!